MS Dhoni Riding Bike Video: रांचीमध्ये बाईक राईड करताना दिसला महिंद्र सिंग धोनी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

महिंद्र सिंग धोनी Honda Repsol 150 गाडी चालवताना दिसत आहे. सोशल मीडियावर नऊ सेंकदचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

MSD BIKE ride PC twitter

MS Dhoni Riding Bike Video: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahindra Sing Dhoni) सध्या रांचीमध्ये आहे. तो रिंगरोडवरील त्याच्या फार्म हाऊसवर कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्याचा एक व्हिडिओ स्वातंत्र्यदिनी व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ त्याच्या फॅनने त्याच्या फॉर्म हाऊसच्या बाहेर रेकॉर्ड करून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये महिंद्र सिंग धोनी Honda Repsol 150 गाडी चालवताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

त्याने आर्मीचे जॅकेट परिधान केले असून तो बाईक चालवत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या फॉर्म हाऊसच्या गेटबाहेर उपस्थित असलेले त्याचे चाहते त्याला हाक मारत आहेत. व्हिडिओ क्लिपमध्ये, धोनी पूर्ण मोटरसायकल रायडिंग गियरमध्ये फार्म हाऊसवर जाताना दिसत आहे. धोनी सध्या रांचीमध्ये आहे आणि तो अनेकदा सायकल चालवताना दिसतो. त्याचे चाहते बाईक चालवतानाचे अनेक व्हिडिओ शेअर करत असतात. धोनी जेवढं क्रिकेटवर प्रेम करतो तेवढंच त्याला बाईक चालवणे आवडते. त्याकडे 50 अधिक वेगवेगळे बाईकचे गॅरेज आहे.

धोनी जेवढं क्रिकेटवर प्रेम करतो तेवढंच त्याला बाईक चालवणे आवडते. त्याकडे ५० अधिक वेगवेगळे बाईकचे गॅरेज आहे. आता धोनीचे चाहते त्याला बाईक चालवताना देखील पाहतात. रांची येथे चाहते धोनीच्या फार्म हाऊसच्या बाहेर गर्दी करत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement