IND vs WI: वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे बाहेर, टी-20 मालिकेसाठी हा गोलंदाज टीम इंडियात
कुलदीप नुकताच एकदिवसीय मालिकेतून टीम इंडियात परतला होता आणि आता टी-20 मालिकेतही त्याच्यासाठी संधी चालून आली आहे.
फिटनेसच्या मुद्द्यावर भारतीय क्रिकेट संघ सतत झगडत असतो. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी कोरोना संसर्गाचे प्रकरण आणि नंतर केएलच्या दुखापतीने संघाला अडचणीत आणले. आता अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर देखील दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सुंदरच्या जागी चायनामन कुलदीप यादवचा T20 संघात समावेश केला आहे. कुलदीप नुकताच एकदिवसीय मालिकेतून टीम इंडियात परतला होता आणि आता टी-20 मालिकेतही त्याच्यासाठी संधी चालून आली आहे.
Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)