Virat Kohli Dance Moves While Exercising: विराट कोहलीने व्यायाम करताना दाखवल्या त्याच्या खास डान्स मूव्ह्स, व्हिडीओ व्हायरल (Watch)
डान्स करताना व्यायाम किंवा व्यायाम करताना डान्स कसा करायचे हे यातून दिसत आहे.
विराट कोहली बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममधून जात आहे. यामुळे त्याच्यावर जोरदार टीकाही होत आहे. मात्र या टीकेला न जुमानता विराट वेळोवेळी त्याच्या मस्तीखोर अंदाजात दिसून आला आहे. अनेकदा क्रिकेटच्या मैदानावरही तो आनंदी मूडमध्ये दिसला आहे. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी तो सोडत नाही. आताही विराटने असेच काहीसे केले आहे. विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये फिटनेस फ्रीक आणि चेष्टेखोर असे दोन्ही विराट एकत्र दिसत आहेत. या माजी भारतीय कर्णधाराने व्यायाम करताना त्याच्या काही मस्त डान्स मूव्ह्स दाखवल्या आहेत. म्हणजेच व्यायाम आणि डान्स यांच्या एका खास मिश्रणाची झलक विराटने दाखवली आहे.
डान्स करताना व्यायाम किंवा व्यायाम करताना डान्स कसा करायचे हे यातून दिसत आहे. विराटने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून, त्यासोबत लिहिले आहे- ‘बर्याच दिवसांपासून प्रलंबित आहे, परंतु माझ्या अंदाजानुसार कधीही उशीर झालेला नसतो.’
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 19, 2022 09:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

