Virat Kohli Century: विराट कोहलीने झळकावले कसोटी क्रिकेटमधील 28 वे शतक, भारताची धावसंख्या 400 धावांच्या जवळ

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या.

Virat Kohli (photo Credit - Twitter)

IND vs AUS 4th Test Day 4 Live Score Update: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. त्याचवेळी चोथ्या दिवसी भारतीय संघाचा डाव सुरू आहे. दरम्यान, भारताचा निम्मा संघ बाद झाला असुन विराट कोहलीने आपले शानदार शतक झळकावले आहे. त्याने 241 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. विराटने आतापर्यंत आपल्या खेळीत पाच चौकार मारले आहेत. भारताची धावसंख्या 400 धावांच्या जवळ पोहोचली आहे. विराट कोहलीने कसोटीतील 28 वे शतक ठोकले आहे. त्याचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now