Virat Kohli New Record: विराट कोहलीने केला 'मोठा विक्रम', टी-20 मध्ये 12000 धावा करणारा ठरला पहिला भारतीय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने या गोलंदाजाच्या चेंडूवर फटकेबाजी करत ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोहली 12000 टी-20 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
CSK vs RCB, IPL 1st Match: आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यात सीएसके आणि आरसीबीचे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने या गोलंदाजाच्या चेंडूवर फटकेबाजी करत ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोहली 12000 टी-20 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने 377 व्या सामन्यात 12000 धावांचा टप्पा पार केला. त्याच्याशिवाय भारताच्या एकाही फलंदाजाला ही कामगिरी करता आलेली नाही. या कालावधीत त्याने 8 शतके आणि 91 अर्धशतके केली आहेत. सर्वात जास्त टी-20 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीबद्दल बोलायचे झाले तर ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)