Virat Kohli New Record: षटकारांच्या बाबतीत विराट कोहलीने केला मोठा विक्रम, आरसीबीसाठी सर्वाधिक षटकार मारणारा ठरला फलंदाज
विराट कोहलीने कोलकाताविरुद्धचे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने 36 चेंडूत 50 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि तीन षटकार आले.
RCB vs KKR, IPL 2024 10th Match: आयपीएल 2024 चा 10 वा सामना शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात होत आहे. हा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. आकडेवारीच्या बाबतीत, केकेआरचा आरसीबीवर वरचष्मा आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 32 सामने खेळले गेले आहेत. यापैकी केकेआरने 18 तर आरसीबीने 14 सामने जिंकले आहेत. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहलीने कोलकाताविरुद्धचे अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने 36 चेंडूत 50 धावा केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून दोन चौकार आणि तीन षटकार आले. याशिवाय त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो आरसीबीसाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत त्याने 240 षटकार मारले आहेत.
VIRAT KOHLI HAS MOST SIXES FOR A FRANCHISE IN THE IPL - 240*. pic.twitter.com/AepvGUJ5ce
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 29, 2024 08:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

