Mohammad Siraj ला विकेट मिळताच Virat Kohli आणि Rohit Sharma झाले खूश, एकमेकांना मारली मिठी, पाहा व्हिडिओ
सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी दरम्यान माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एकमेकांना अतिशय प्रेमाने मिठी मारताना दिसले. हा प्रसंग तेव्हा घडला जेव्हा विराटने मोहम्मद सिराजकडे बोट दाखवून त्याला गोलंदाजी करण्यास सांगितले...
IND vs SA 2nd Test: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) दुसरी कसोटी सामना (बुधवार) पासून न्यूलँड्स, केपटाऊन येथे खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ 23.2 षटकात 55 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजी दरम्यान माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एकमेकांना अतिशय प्रेमाने मिठी मारताना दिसले. हा प्रसंग तेव्हा घडला जेव्हा विराटने मोहम्मद सिराजकडे बोट दाखवून त्याला गोलंदाजी करण्यास सांगितले, त्याच्या मास्टर प्लॅननुसार गोलंदाजी करत सिराजने पुढच्याच चेंडूवर विकेट घेतली. त्यानंतर कोहली आणि रोहित एकमेकांकडे धावले. मोहम्मद सिराजने या सामन्यात 6 विकेट घेतल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हे देखील वाचा: Virat Kohli's Super Plan To Siraj: विराट कोहलीच्या मास्टर प्लॅनमुळे मोहम्मद सिराजला मिळाली विकेट, पुढच्याच चेंडूवर मार्को जॅन्सन झाला बाद, पाहा व्हिडिओ)
When you know it’s a planned wicket, the Rohit-Virat hug 🫂✨ pic.twitter.com/CD2qftG5MK
— P ✨ (@ssnoozee_) January 3, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2024 04:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

