Virat Kohli पुन्हा RCB चा कर्णधार, नाणेफेक करण्यासाठी मैदानात दिसल्याने सर्वांनाच बसला आश्चर्याचा धक्का
पण नाणेफेकीच्या वेळी विराट कोहली कर्णधार म्हणून नाणेफेक करण्यासाठी मैदानात दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
आयपीएल 2023 चा 27 वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (PBKS vs RCB) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण नाणेफेकीच्या वेळी विराट कोहली (Virat Kohli) कर्णधार म्हणून नाणेफेक करण्यासाठी मैदानात दिसल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 2021 सालापासून आरसीबीचे कर्णधारपद सोडलेला विराट एका वर्षानंतर संघाची धुरा सांभाळत आहे. विराट कोहलीला कर्णधार म्हणून पाहून प्रत्येक चाहत्यांना आनंद झाला आणि विराटचे नाव सोशल मीडियावर ट्रेंड करू लागले. दरम्यान, इम्पॅक्ट प्लेअर नियमांमुळे पंजाबविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात विराट कोहलीला कर्णधार बनवण्यात आले आहे. फाफ डू प्लेसिस हा प्लेइंग 11 चा भाग आहे पण खेळाडूंच्या नियमांमुळे तो दुसऱ्या डावात बाहेर पडू शकतो. त्यामुळेच विराट या सामन्यात कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)