Video: पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर Mohammad Rizwan चा महिला चाहतीसोबत सेल्फी क्लिक करण्यास नकार; व्हिडीओ व्हायरल (Watch)

एका महिला चाहत्याने रिझवानसोबत फोटो क्लिक करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु रिझवानने यासाठी पूर्णपणे नकार दिला.

Mohammad Rizwan

पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर मोहम्मद रिझवान टी-20 विश्वचषकानंतर आपल्या देशात परतला आहे. जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक असलेल्या रिझवानची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. रिझवानचे त्याच्या चाहत्यांशीही खास नाते आहे. तो नेहमीच त्याच्या चाहत्यांना मोठ्या प्रेमाने आणि शिष्टाचाराने भेटताना दिसतो. मात्र, आता रिझवानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानच्या या सलामीवीर फलंदाजाने एका महिला चाहत्याची छोटीशी इच्छा पूर्ण केली नाही.

रिझवान एका कार्यक्रमात पोहोचला होता जिथे कार्यक्रम संपल्यानंतर नेहमीप्रमाणे चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या क्रिकेटरसोबत फोटो क्लिक केले. रिझवान तिथे उपस्थित असलेल्या सर्व पुरुष चाहत्यांसोबत सेल्फी क्लिक केली. त्यानंतर एका महिला चाहत्याने रिझवानसोबत फोटो क्लिक करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु रिझवानने यासाठी पूर्णपणे नकार दिला. त्याने थेट महिला चाहत्याला सेल्फीसाठी नकार दिला. सध्या याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या