Video: सुरक्षेचे उल्लंघन करुन चाहत्याचा मैदानात प्रवेश, विराट कोहलीच्या पायांना केला स्पर्श

सामन्यादरम्यान, एका प्रेक्षकाने सुरक्षेचे उल्लंघन केले आणि तो मैदानाच्या मध्यभागी आला. तो कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकमा देऊन खेळपट्टीवर पोहोचला. त्याने कोहलीच्या पायाला स्पर्श केले.

Photo Credit - X

Railways vs Delhi: विराट कोहली (Virat Kohli) 12 वर्षांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. तो अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध रेल्वे सामना खेळत आहे. गुरुवारी, 30 जानेवारी रोजी, कोहलीला पाहण्यासाठी दिल्लीतील या स्टेडियममध्ये मोठ्या संख्येने लोक पोहोचले. विराट कोहलीला पाहण्यासाठी लांबत लाब रांगा लागल्या होत्या. पण दरम्यान, सामन्यादरम्यान, एका प्रेक्षकाने सुरक्षेचे उल्लंघन केले आणि तो मैदानाच्या मध्यभागी आला. तो कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांना चकमा देऊन खेळपट्टीवर पोहोचला. त्याने कोहलीच्या पायाला स्पर्श केले. मैदानावर चाहता आल्याने खेळ काही काळ थांबवावा लागला. दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement