ENG vs AUS, Ashes Series 2023: लंच ब्रेक दरम्यान लॉर्ड्स लाँग रूममध्ये उस्मान ख्वाजाची प्रेक्षकांसोबत झाली तू-तू-मैं-मैं; पहा व्हिडिओ
खरं तर, इंग्लंडच्या डावात यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो अत्यंत विचित्र पद्धतीने धावबाद झाला. त्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या इंग्लंडच्या चाहत्यांचा रोष ऑस्ट्रेलियन संघावर पाहायला मिळाला.
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) आणि डेव्हिड वॉर्नर मॅचच्या पाचव्या दिवशी लंचच्या वेळी लॉर्ड्सच्या मैदानावर लॉंग रूममधून बाहेर पडताना एमसीसी सदस्याशी भिडले. खरं तर, इंग्लंडच्या डावात यष्टिरक्षक-फलंदाज जॉनी बेअरस्टो अत्यंत विचित्र पद्धतीने धावबाद झाला. त्यामुळे स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या इंग्लंडच्या चाहत्यांचा रोष ऑस्ट्रेलियन संघावर पाहायला मिळाला. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरी चाहत्यांच्या निशाण्यावर होता, ज्याने आपल्या हुशारीने जॉनी बेअरस्टोला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर, जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ लंचच्या वेळी लॉर्ड्स स्टेडियमच्या लाँग रूममधून ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होता, त्याचवेळी सलामीवीर उस्मान ख्वाजाने एमसीसीच्या सदस्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. यानंतर तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. दरम्यान, डेव्हिड वॉर्नर उस्मान ख्वाजाच्या मागे येऊन एमसीसीच्या त्या सदस्याला उत्तर देताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)