Uganda क्रिकेट संघाने रचला इतिहास, T20 World Cup 2024 साठी ठरला पात्र
युगांडाने क्रिकेट टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) साठी पात्र ठरण्यात यश मिळविले आहे. यासह या स्पर्धेत सहभागी होणारा हा केवळ पाचवा आफ्रिकन देश ठरला आहे.
Uganda Team Qualified for the T20 World Cup 2024: युगांडा (Uganda) क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. युगांडाने क्रिकेट टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) साठी पात्र ठरण्यात यश मिळविले आहे. यासह या स्पर्धेत सहभागी होणारा हा केवळ पाचवा आफ्रिकन देश ठरला आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे संघ 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता फेरीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, नामिबिया आणि युगांडाकडून पराभवाचा सामना करावा लागलेला झिम्बाब्वे संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. गेल्या टी-20 विश्वचषकात झिम्बाब्वे संघाचा भाग होता. (हे देखील वाचा: Jai Shree Ram By Glenn Maxwell: तुफानी खेळानंतर ग्लेन मॅक्सवेलची पोस्ट व्हायरल, जय श्री राम म्हणत भारताला दिला निरोप)
T20 World Cup 2024 साठी आतापर्यंत पात्र ठरलेले संघ:
वेस्ट इंडिज, यूएसए, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
पाहा ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)