UAE ने क्रिकेटच्या देवाला दिली खास भेट, शारजाहमध्ये Sachin Tendulkar चे नाव झाले अजरामर
यूएईच्या प्रमुख शारजाह क्रिकेट स्टेडियमच्या वेस्ट स्टँडचे सचिन तेंडुलकरच्या नावावर 'सचिन तेंडुलकर स्टँड' असे नामकरण करण्यात आले. यूएई सरकारच्या या पावलाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. खुद्द सचिननेही याबद्दल आभार मानले आहेत.
क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) त्याच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त यूएईने (UAE) खास भेट दिली आहे. सोमवारी, यूएईच्या प्रमुख शारजाह क्रिकेट स्टेडियमच्या वेस्ट स्टँडचे सचिन तेंडुलकरच्या नावावर 'सचिन तेंडुलकर स्टँड' असे नामकरण करण्यात आले. यूएई सरकारच्या या पावलाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. खुद्द सचिननेही याबद्दल आभार मानले आहेत. खरंतर 24 एप्रिल हा सचिनसाठी खास दिवस होता. कारण त्याचा 50 वा वाढदिवस होता, सचिनचा या दिवशी शारजाहमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाठोपाठ शतके झळकावण्याचा 25 वा वर्धापन दिन होता. यानिमित्ताने शारजाह स्टेडियमवर स्टँडला त्याच्या नावावर जाणे ही सचिनसाठी खास भेट आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)