U19 Asia Cup 2021: युवा टीम इंडियाची फायनलमध्ये धडक, बांगलादेश अंडर-19 संघाला 103 धावांनी लोळवलं; श्रीलंकेशी विजेतेपदासाठी भिडणार
उपांत्य फेरीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 243 धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशचा डाव 38.2 षटकात अवघ्या 140 धावांत आटोपला. दुसरीकडे, श्रीलंकेने पाकिस्तानवर मात करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
U19 Asia Cup 2021: यश धुलच्या (Yash Dhull) नेतृत्वात भारतीय अंडर-19 संघाने आशिया कपच्या (Asia Cup) अंतिम फेरीत धडक मारली आहे आणि आता त्यांचा सामना श्रीलंकेशी (Sri Lanka) होईल. श्रीलंकेने पाकिस्तानवर मात करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. उपांत्य फेरीत भारतीय संघाचा सामना बांगलादेशशी झाला. टीम इंडियाने (Team India) प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 243 धावा केल्या. त्यानंतर बांगलादेशचा डाव 38.2 षटकात अवघ्या 140 धावांत आटोपला आणि सामना 103 धावांनी जिंकला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)