SRH vs RCB, IPL 2023 Match 65 Live Streaming: आज हैदराबाद आणि बंगळुरू यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार लाईव्ह
अशा परिस्थितीत आरसीबीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. त्याचवेळी सनरायझर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, पण हा सामना जिंकल्याने आरसीबीचा खेळ खराब होऊ शकतो.
आयपीएल 2023 च्या (IPL 2023) 65 व्या साखळी सामन्यात, आज (18 मे) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (SRH vs RCB) संघ आमनेसामने असतील. हैदराबादच्या (Hyderabad) राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून हा सामना रंगणार आहे. या मोसमातील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. आरसीबीला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीत आरसीबीला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे. त्याचवेळी सनरायझर्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, पण हा सामना जिंकल्याने आरसीबीचा खेळ खराब होऊ शकतो. दरम्यान, या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर विविध भाषांमध्ये केले जाणार आहे. लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर उपलब्ध असेल. येथे इंग्रजी तसेच इतर भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकण्याचा पर्याय आहे. हा सामना Jio Cinema अॅपवर मोफत पाहता येईल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)