LSG vs CSK, IPL 2024 34th Match Live Streaming: आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघांत होणार लढत, कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह घ्या जाणून
चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. सांघिक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले असून, संघ गुणतालिकेत 5व्या क्रमांकावर आहे.
LSG vs CSK, IPL 2024 34th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 34 वा सामना (IPL 2024) लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज (LSG vs CSK) यांच्यात होणार आहे. लखनौच्या घरच्या मैदानावरील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमधील हा सामना सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्सने आतापर्यंत 6 सामने खेळले असून 4 जिंकले आहेत. सांघिक गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सने 6 पैकी 3 सामने जिंकले असून, संघ गुणतालिकेत 5व्या क्रमांकावर आहे. दरम्यान, लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण केले जाईल. तर मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर पाहता येईल.
It's a 𝙎𝙪𝙥𝙚𝙧 battle at Ekana tonight ⚔
Tune in to #LSGvCSK 6.30 pm onwards with #IPLonJioCinema 📲#TATAIPL pic.twitter.com/ziMihKFZKx
— JioCinema (@JioCinema) April 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 19, 2024 04:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

