IND vs SL ICC World Cup 2023 Live Streaming: उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित करण्यासाठी आज भारत भिडणार श्रीलंकेशी, कुठे पाहणार सामाना? घ्या जाणून
आज गुरुवार, 2 नोव्हेंबरला संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. जे जिंकून टीम इंडियाला उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित करायचे आहे.
वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची विजयी मोहीम सुरूच आहे. भारतीय संघाने आतापर्यंत खेळलेले सर्व 6 सामने जिंकले आहेत. आज गुरुवार, 2 नोव्हेंबरला संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. जे जिंकून टीम इंडियाला उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित करायचे आहे. भारत आणि श्रीलंका 2 नोव्हेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सामना सुरू होईल. क्रिकेट चाहत्यांना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डीडी स्पोर्ट्सवर सामना पाहता येईल. याशिवाय, तुम्ही Disney+ Hotstar अॅपवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकाल. हे तेच स्टेडियम आहे, जिथे 2011 मध्ये भारताने श्रीलंकेला हरवून एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)