IND vs SA: आफ्रिकेला तिसरा धक्का; शमीने बावुमाला केले बाद, अर्शदीपची घातक गोलंदाजी
मोहम्मद शमीने कर्णधार टेंबा बावुमाला यष्टिरक्षक दिनेश कार्तिककडे झेलबाद केले. बावुमा 15 चेंडूत 10 धावा करू शकला.
पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात म्हणजेच सहाव्या षटकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला तिसरा धक्का बसला. मोहम्मद शमीने कर्णधार टेंबा बावुमाला यष्टिरक्षक दिनेश कार्तिककडे झेलबाद केले. बावुमा 15 चेंडूत 10 धावा करू शकला. पॉवरप्लेअखेर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 बाद 24 अशी आहे. डेव्हिड मिलर आणि एडन मार्कराम सध्या क्रीजवर आहेत. याआधी अर्शदीप सिंहने क्विंटन डी कॉक आणि रिले रुसो यांना एकाच षटकात बाद केले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)