MI vs DC, IPL 2024 20th Match: आज आयपीएल 2024 च्या 20 व्या (IPL 2024) सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी (MI vs DC) होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. आतापर्यंतचा प्रवास मुंबई आणि दिल्लीसाठी काही खास राहिलेला नाही. एमआय संघाने तिन्ही सामने गमावले आहेत, तर दिल्लीला चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सूर्यकुमार यादवने पुनरागमन केले आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 234 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधिक 49 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून अक्षर पटेल आणि एनरिक नॉर्टजे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकात 235 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीला तिसरा धक्का लागला आहे. दिल्लीचा स्कोर 145/4
Jasprit Bumrah gets his 2️⃣nd wicket 🙌
Abishek Porel is the man who has to depart after a good cameo of 41(31)
With 5️⃣ overs to go, can #DC pull it off from here? 🤔
Follow the Match ▶ https://t.co/Ou3aGjpb7P #TATAIPL | #MIvDC pic.twitter.com/GSSXKhugyT
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)