Commentators for World Cup 2023 Final: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यात रवी शास्त्री, हर्षा भोगले यांच्यासह 'हे' खेळाडू करणार कॉमेंट्री, पाहा प्रत्येकाची नावे
तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावून पुनरागमन केले आणि सर्व सामने जिंकले. दोन्ही संघांनी विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. अशा स्थितीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 च्या (ICC World Cup 2023) अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) आमनेसामने येणार आहेत. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारतीय संघ सलग 10 विजयांसह अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिले दोन सामने गमावून पुनरागमन केले आणि सर्व सामने जिंकले. दोन्ही संघांनी विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. अशा स्थितीत चुरशीची स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान, अंतिम सामन्यापूर्वी सर्व समालोचकांची नावे समोर आली आहेत. विश्वचषक 2023 फायनलसाठी समालोचकांमध्ये रवी शास्त्री, हर्षा भोगले, नासेर हुसेन, इयान स्मिथ, इयान बिशप, पाँटिंग, मार्क हॉवर्ड, दिनेश कार्तिक, सुनील गावस्कर, मॅथ्यू हेडन, इयॉन मॉर्गन, शेन वॉटसन, आरोन फिंच, संजय मांजरेकर, हे सर्वजण भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात कॉमेंट्री करतील.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)