IND vs BAN 2nd Day 3 Live Update: बोबंला! मैदानाच्या स्थितीवर अद्याप पंच खूश नाही, पुढील पाहणी होणार 12 वाजता

तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता पाहणीसाठी आलेले पंच मैदानाच्या स्थितीवर खूश नाहीत, पुढील पाहणी 12 वाजता होणार आहे. दोन्ही संघ अद्याप मैदानात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Kanpur Green Park (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team Match Scorecard:  भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (India National Cricket Team) विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. हा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला जात आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. त्याआधी, दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. बांगलादेशने पहिल्या डावात 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. पावसामुळे पहिल्या दिवसाच्या खेळावरही परिणाम झाला. मात्र दुसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही. दरम्यान, 10 वाजता पाहणीसाठी आलेले पंच मैदानाच्या स्थितीवर खूश नाहीत, पुढील पाहणी 12 वाजता होणार आहे. दोन्ही संघ अद्याप मैदानात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement