IND vs AUS 1st T20 2023 Live Streaming: आजपासुन भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 'टी-20'चा थरार, कधी, कुठे पाहणार सामना? घ्या जाणून

आजपासुन म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना विशाखापट्टणम येथे संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. या मालिकेकडे टीम इंडियाच्या 2024 टी-20 विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे.

IND vs AUS (Photo Credit - Twitter)

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 संपल्यानंतर आजपासुन म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना विशाखापट्टणम येथे संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे. या मालिकेकडे टीम इंडियाच्या 2024 टी-20 विश्वचषकाच्या तयारीची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. या टी-20 मालिकेसाठी संघाची कमान स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तुम्ही जियो सिनेमा अॅप आणि वेबसाइटवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. तुम्ही स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. (हे देखील वाचा: IND vs AUS Final: फायनलमध्ये Travis Head ने क्लीन कॅच न घेतल्याने Rohit Sharma नाबाद असल्याचा यूट्यूबवर दावा; ICC ने केली भारत-ऑस्ट्रेलिया रिमॅचची घोषणा? जाणून घ्या सत्य)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement