ICC Cricket World Cup 2023: विश्वचषकाचे वेळापत्रक पुन्हा बदलणार, पाकिस्तानच्या आणखी एका सामन्यावर टांगती तलवार
त्यामुळे आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ने देखील भारतीय क्रिकेट बोर्डाला नोव्हेंबर रोजी होणारा इंग्लंड आणि पाकिस्तान (ENG vs PAK) सामना बदलण्याची विनंती केली आहे.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 ला (ODI World Cup 2023) आता दोन महिने बाकी आहेत पण आयसीसी आणि बीसीसीआयने जाहीर केलेल्या अधिकृत वेळापत्रकात वारंवार बदल होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यातही बदल केले जाणार आहे. त्यामुळे आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (CAB) ने देखील भारतीय क्रिकेट बोर्डाला नोव्हेंबर रोजी होणारा इंग्लंड आणि पाकिस्तान (ENG vs PAK) सामना बदलण्याची विनंती केली आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील लीग टप्प्यातील शेवटचा सामना 12 नोव्हेंबर रोजी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील ऐतिहासिक मैदान असलेल्या ईडन गार्डन्सवर होणार आहे आणि त्याच दिवशी कोलकातामध्ये काली पूजेचा सणही साजरा केला जाणार आहे. त्यामुळे सीएबीने बीसीसीआयला हा सामना रीशेड्यूल करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागणार नाही. काली पूजनाच्या उत्सवात पोलिसांकडून अतिरिक्त सुरक्षा पुरवली जाणार नसल्यामुळे CAB नेही ही विनंती केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)