लय भारी! Lasith Malinga पुन्हा Mumbai Indians मध्ये सामील, यावेळी मिळाली मोठी जबाबदारी

लसिथ मलिंगा पुन्हा एकदा मुंबई संघाला दणका देण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी त्याच्याकडे गोलंदाजीची नव्हे तर गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे.

श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाला (Lasith Malinga) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघात सामील केले आहे. लसिथ मलिंगा आयपीएल 2024 च्या (IPL 2024) आधी पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज शेन बाँडने राजीनामा दिल्यानंतर लसिथची या पदासाठी निवड करण्यात आली होती. वास्तविक, लसिथ मलिंगा पुन्हा एकदा मुंबई संघाला दणका देण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी त्याच्याकडे गोलंदाजीची नव्हे तर गोलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता मलिंगा रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीला अधिक धार देईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement