LSG New Jersey: आयपीएलमध्ये दिसणार फुटबॉलचा रंग, आरसीबी आणि जीटीनंतर लखनऊनेही बदलली जर्सी
हा सामना कोलकात्याच्या घरच्या मैदानावर होणार असून या सामन्यातही फुटबॉलचा रंग पाहायला मिळणार आहे कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्सप्रमाणे लखनौचाही रंग बदलणार आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) चा मोसम आपल्या समारोपाकडे वाटचाल करत आहे आणि आता फक्त काही सामने बाकी आहेत. सर्व संघ आपला शेवटचा सामना खेळणार आहेत. लखनौ सुपर जायंट्सचा शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध (LSG vs KKR) होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या घरच्या मैदानावर होणार असून या सामन्यातही फुटबॉलचा रंग पाहायला मिळणार आहे कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्सप्रमाणे लखनौचाही रंग बदलणार आहे. लखनौ सध्या प्लेऑफच्या शर्यतीत ठाम आहे. गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेल्या लखनौला त्यांच्या शेवटच्या सामन्यात प्लेऑफचे तिकीट मिळवावे लागेल आणि त्यासाठी संघ शनिवार, 20 मे रोजी कोलकाता येथे उपस्थित असेल. हे शहर नाईट रायडर्सचे माहेरघर असले तरी आता लखनऊशीही त्याचा विशेष संबंध आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)