IND vs BAN Asia Cup 2023: बांगलादेशचा हा प्राणघातक खेळाडू भारताविरुद्धचा सामना खेळणार नाही, आशिया कपच्या मध्यावर परतला मायदेशी

बांगलादेशचा संघ आधीच अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता आशिया चषकाच्या मध्यावर त्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज मुश्कीफुर रहीम मायदेशी परतला आहे.

Mushfiqur Rahim (Photo Credit - Twitter)

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) आशिया कप 2023 च्या (Asia Cup 2023 Final) फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताने सुपर-4 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 288 धावांनी तर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा 41 धावांनी पराभव केला. टीम इंडिया 15 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध सामना खेळणार आहे. बांगलादेशचा संघ आधीच अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आता आशिया चषकाच्या मध्यावर त्याला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेशचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज मुश्कीफुर रहीम (Mushfiqur Rahim) मायदेशी परतला आहे. रहीम आपल्या नवजात बालक आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी घरी परतला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्याची रजा वाढवली आहे. या कारणामुळे तो भारताविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement