Telangana CM Meet Mohammed Siraj: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची मोठी घोषणा! विश्वचषक विजेता मोहम्मद सिराजला भूखंडासह मिळणार सरकारी नोकरी

भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या संदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Telangana CM A Revanth Reddy) यांनी नुकतीच मोहम्मद सिराजची भेट घेऊन त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Telangana CM Meet Mohammed Siraj (Photo Credit - X)

Mohammed Siraj Government Jobs Telangana: मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा टी-20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा (Team India) भाग होता. सिराजने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत जेतेपद पटकावले. भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडूंचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या संदर्भात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (Telangana CM A Revanth Reddy) यांनी नुकतीच मोहम्मद सिराजची भेट घेऊन त्यांच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि सिराजला सरकारी नोकरी आणि जमीन देण्याची घोषणा केली आहे. यावेळी सिराज यांनी मुख्यमंत्र्यांना टीम इंडियाची जर्सी भेट दिली. सिराज आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनही उपस्थित होता. तेलंगणाच्या सीएमओने या बैठकीची फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे.

पाहा फोटो आणि व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement