IND vs NZ, Tim Southee's Hat-Trick: टीम साऊदीचा ट्रिपल धमाका, टी-20 मध्ये दुसऱ्यांदा घेतली हॅटट्रिक (Watch Video)
शेवटच्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या टीम साऊदीने अप्रतिम गोलंदाजी करत भारताच्या तीन फलंदाजांना जबरदस्त हॅट्ट्रिकसह (Tim Southee's Hat-Trick) बाद केले.
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडने (IND vs NZ) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय फलंदाजांनी त्यांचे निर्णय उलटवले. भारताने न्युझीलंड समोर 191 धावांचे लक्ष्य दिले. एकेकाळी भारत 200 चा टप्पा सहज पार करेल असे वाटत होते पण शेवटच्या षटकात गोलंदाजी करायला आलेल्या टीम साऊदीने अप्रतिम गोलंदाजी करत भारताच्या तीन फलंदाजांना जबरदस्त हॅट्ट्रिकसह (Tim Southee's Hat-Trick) बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मलिंगानंतर टी-20 क्रिकेटमध्ये दोन हॅट्ट्रिक करणारा तो दुसरा गोलंदाज आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)