IND vs AUS World Cup 2023: टीम इंडियाने विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात नोंदवला लाजिरवाणा विक्रम, 3 फलंदाज शून्यावर बाद (Watch Video)
भारतीय संघाने (Team India) विश्वचषक 2023 च्या पहिल्याच सामन्यात एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय आघाडीची फळी पूर्णपणे कोलमडली. अवघ्या 2 षटकांत इशान किशन (Ishan Kishan), कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि त्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतले. कोणत्याही एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाची ही सर्वात खराब सुरुवात आहे. डावाच्या सुरुवातीलाच पहिल्याच षटकात इशान किशनच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. तसेच त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर शुन्यावर बाद झाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)