Team India Victory Parade Live Update: टीम इंडियाची विजयी परेड सुरू, खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी चाहत्याचा गजब कारनामा (Watch Video)

टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवुन दिल्लीहून मुंबईत पोहोचली. आता नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक सुरु झाली आहे

Team India Victory Parade: टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला आहे. टीम इंडियाचे मायदेशात सकाळी भारतात जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवुन दिल्लीहून मुंबईत पोहोचली. आता नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक सुरु झाली आहे. भारतीय संघाचे खेळाडू विजय रथावर स्वार झाले आहेत. टीम इंडिया मरीन ड्राइव्हवरून वानखेडे स्टेडियमच्या दिशेने निघाले आहे. विराट कोहलीने ट्रॉफी उचलून चाहत्यांना शुभेच्छा दिल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement