T20 World Cup Victory Celebration: वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा सन्मान, रोहित शर्मा म्हणाला- ही ट्रॉफी संपूर्ण देशाची आहे

सामना पाहणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार." रोहित शर्मा पुढे म्हणाला की, गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.

Team India Victory Parade: टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला आहे. टीम इंडियाचे मायदेशात सकाळी भारतात जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवुन दिल्लीहून मुंबईत पोहोचली. नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक सुरु झाली असुन ते मरीन ड्राइव्हवरून वानखेडे स्टेडियमला पोहचले. त्याचवेळी तिथे त्यांचा गौरव करण्यात आला. यादरम्यान टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "ही ट्रॉफी संपूर्ण देशाची आहे. सामना पाहणाऱ्या सर्व चाहत्यांचे आभार." रोहित शर्मा पुढे म्हणाला की, गेल्या तीन-चार वर्षांपासून आम्ही केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले आहे, मला माझ्या या संघाचा अभिमान वाटतो. विश्वचषक जिंकल्यानंतर करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif