IND vs BAN 2nd Test Day 4 Live Update: टीम इंडियाची सातवी विकेट पडली, बांगलादेश विजयापासून तीन विकेट दूर
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला सातवा मोठा धक्का बसला. ऋषभ पंत नंतर अक्षर पटेल पण देखील पॅव्हेलियनमध्ये परतला आहे.
IND vs BAN 2nd Test: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिली कसोटी जिंकून टीम इंडियाने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरूच आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 4 विकेट गमावून 45 धावा केल्या होत्या. अक्षर पटेल 26 आणि जयदेव उनाडकट 3 धावा करून क्रीजवर उपस्थित आहेत. टीम इंडियाला अजूनही विजयासाठी 89 धावांची गरज आहे. बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या 231 धावांवर आटोपला. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक 73 धावा केल्या. टीम इंडियाकडून अक्षर पटेलने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाला सातवा मोठा धक्का बसला. ऋषभ पंत नंतर अक्षर पटेल पण देखील पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. आता बांगलादेशला जिंकण्यासाठी तीन विकेटची गरज आहे. टीम इंडियाचा स्कोर 71/7 आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)