ICC U19 WOMEN'S WC IND vs SCO: टीम इंडियाने स्कॉटलंडचा 85 धावांनी केला पराभव, मन्नत कश्यप आणि अर्चना देवी यांनी केली शानदार गोलंदाजी
टीम इंडियाकडून गोंगडी त्रिशाने सर्वाधिक 57 धावा केल्या.
अंडर-19 महिला विश्वचषक 2023 च्या 20 व्या सामन्यात फॉर्मात असलेल्या भारतीय संघाने स्कॉटलंडचा धावांनी पराभव केला. टीम इंडिया आणि स्कॉटलंड यांच्यातील हा सामना बेनोनी येथील विलोमूर पार्क बी मैदानावर खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 149 धावा केल्या. टीम इंडियाकडून गोंगडी त्रिशाने सर्वाधिक 57 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटलंडचा संपूर्ण संघ 13.1 षटकात अवघ्या 66 धावांवर गारद झाला. टीम इंडियाकडून मन्नत कश्यपने चार आणि अर्चना देवीने तीन विकेट घेतल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)