IND vs AUS, WTC Final 2023: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा प्लेइंग 11

दोन्ही संघांमधील हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. टीम इंडिया दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे.

IND vs AUS, WTC Final 2023: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पहा प्लेइंग 11
IND vs AUS (Photo Credit - ICC)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. टीम इंडिया दुसऱ्यांदा डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला आहे. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

पहा प्लेइंग इलेव्हनवर 

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 07, 2023 02:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).