Blind T20 World Cup 2022: अंधांसाठीचा टी-20 विश्वचषक 2022 भारताच्या खिशात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन

या विजयासह भारताने 2012 आणि 2017 नंतर तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. भारतीय संघावर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

IND Wins Blind T20 World Cup 2022 (Photo Credit - Twitter)

Blind T20 World Cup 2022: शनिवारी 17 डिसेंबर रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर अंधांसाठीच्या टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा 120 धावांनी पराभव करून टी-20 विश्वचषक विजेतेपदाचा मुकुट पटकावला. भारताने 277/2 धावा केल्या तर बांगलादेशला केवळ 157/3 धावा करता आल्या. या विजयासह भारताने 2012 आणि 2017 नंतर तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत इतिहास रचला आहे. भारतीय संघावर चहूबाजूंनी अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड , पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराद ठाकुर यांनी अंधांसाठीच्या वीस षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत विजेता झाल्याबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)