T20 World Cup Final: पाकिस्तानच्या पराभवानंतर PM Shehbaz Sharif यांना भारतीय लष्कराचे दिग्गज KJS Dhillon यांच्याकडून चोख प्रत्युत्तर, ट्विट व्हायरल
केजेएस ढिल्लन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे.
टी-20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. अशाप्रकारे हा संघ दुसऱ्यांदा T20 विश्वचषक विजेता बनला आहे. यापूर्वी 2010 मध्ये इंग्लंड संघाने हे विजेतेपद पटकावले होते. 2010 साली इंग्लंड संघाने अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. इंग्लंडच्या विजयावर आणि पाकिस्तानच्या पराभवावर सोशल मीडिया यूजर्स सातत्याने प्रतिक्रिया देत आहेत, मात्र सोशल मीडियावर एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे ट्विट केजेएस ढिल्लन यांचे आहे. केजेएस ढिल्लन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. टीम इंडियाच्या या पराभवाची पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ट्विट करून खिल्ली उडवली. आता KJS Dhillon त्याच ट्वीटला, ‘93000/0 still remains unbeaten, Jai Hind’ असे उत्तर दिले आहे. 1971 च्या युद्धानंतर, सुमारे 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय सशस्त्र दलांसमोर आत्मसमर्पण केले आणि त्यांना युद्धबंदी म्हणून घेतले गेले. हा त्याचाच संदर्भ आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)