IPL 2023 Match 10, LSG vs SRH Live Score Update: सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय

लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. केएल राहुल हा लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमात आज लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद (LSG vs SRH) यांच्यात सामना होत आहे. लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. केएल राहुल हा लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. त्याचबरोबर सनरायझर्स हैदराबादची जबाबदारी एडन मार्करामच्या खांद्यावर आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग इलेव्हनवर एक नजर:

लखनौ सुपरजायंट्स : केएल राहुल (कर्णधार), काईल मेयर्स, दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, कुणाल पांड्या, अमित मिश्रा, यश ठाकूर, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई.

सनरायझर्स हैदराबाद : मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंग (यष्टीरक्षक), राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हॅरी ब्रूक, वॉशिंग्टन सुंदर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक, आदिल रशीद.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement