Rohit Sharma Fifty: भारताची धमाकेदार सुरुवात, रोहित शर्माने अवघ्या 30 चेंडूत झळकावले शानदार अर्धशतक

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतापुढे 273 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्ताकडून हशमतुल्ला शाहिदी 80 तर अजमतुल्ला उमरझाई 62 धावा केल्या.

Rohit Sharma Fifty: भारताची धमाकेदार सुरुवात, रोहित शर्माने अवघ्या 30 चेंडूत झळकावले शानदार अर्धशतक

आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) नवव्या सामन्यात बुधवारी (11 ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात सामना खेळवला जात आहे. टीम इंडियासमोर अफगाणिस्तानला मात करण्याचे आव्हान असेल. तर बांगलादेशकडून पराभव होवुन अफगाणिस्तान दुसऱ्या सामन्यात पहिल्या विजयाच्या शोधात असतील. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे, तर अफगाणिस्तानचे कर्णधार हशमतुल्ला शाहिदीकडे आहे. दरम्यान, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत भारतापुढे 273 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्ताकडून हशमतुल्ला शाहिदी 80 तर अजमतुल्ला उमरझाई 62 धावा केल्या. तसेच भारतीय गोलंदाजाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 273 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने अफगाणिस्तानला धुण्याची सुरुवात केली आहे तसेच रोहित शर्माने आपले अर्धशतक पुर्ण केले आहे. भारताचा स्कोर 75/0

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 11, 2023 07:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).