Sri Lanka vs New Zealand 1st Test 2024 Day 2 Live Streaming: दुसऱ्या दिवसाच्या खेळाला थोड्याच वेळात होणार सुरुवात, पहिल्या दिवशी श्रीलंकेने केल्या 302 धावा; एका क्लिकवर येथे पाहा लाइव्ह
दोन्ही संघांमधील हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने पहिल्या डावात 88 षटकांत 7 गडी गमावून 302 धावा केल्या होत्या. श्रीलंकेसाठी प्रथम कमिंडू मेंडिसने शतक झळकावले.
Sri Lanka National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: श्रीलंका राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळला भारतीय वेळेनुसार सकाळी 10.00 वाजता सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गॅले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने पहिल्या डावात 88 षटकांत 7 गडी गमावून 302 धावा केल्या होत्या. श्रीलंकेसाठी प्रथम कमिंडू मेंडिसने शतक झळकावले. कामिंडू मेंडिसने 173 चेंडूत 114 धावा केल्या. याशिवाय कुशल मेंडिसने 68 चेंडूत 50 धावा केल्या. सध्या श्रीलंकेसाठी रमेश मेंडिस 14 धावांवर नाबाद असून प्रभात जयसूर्या 0 धावांवर नाबाद आहे. तर न्यूझीलंडसाठी विल्यम ओरूर्कने पहिल्या डावात सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय ग्लेन फिलिप्सने दोन, कर्णधार टीम साऊथीने एक आणि एजाज पटेलने एक विकेट घेतली. दरम्यान, या मालिकेचे अधिकृत प्रसारण सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर आहे. अशा परिस्थितीत, चाहत्यांना श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण Sony Ten 1 SD/HD वर पाहता येईल. याशिवाय FanCode ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. मात्र यासाठी चाहत्यांना वर्गणी घ्यावी लागणार आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)