IND vs SL 2nd ODI Live Score Update: श्रीलंकेने भारतासमोर ठेवले 241 धावांचे लक्ष्य, वॉशिंग्टन सुंदरने घेतले 3 बळी

दोन्ही संघांमधील पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला होता. आता दुसऱ्या सामन्यातून दोन्ही संघांना मालिकेतील पहिला विजय मिळवायचा आहे. आज जर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तर टीम इंडिया विजयाचे शतक ठोकेल.

Team India (Photo Credit - X)

IND vs SL 2nd ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला (IND vs SL 2nd ODI) जात आहे. याआधी दोन्ही संघांमधील पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला होता. आता दुसऱ्या सामन्यातून दोन्ही संघांना मालिकेतील पहिला विजय मिळवायचा आहे. आज जर भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तर टीम इंडिया विजयाचे शतक ठोकेल. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असलंकाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेवून 50 षटकात 240 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर, दुसरीकडे श्रीलंकेकडून कामिंदू मेंडिसने सर्वाधिक 40 धावा केल्या. आता भारताला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 241 धावा करायच्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement