SRH vs DC Live Update: दिल्लीने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, पहा दोन्ही संघ

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. हैदराबाद संघाने मागील दोन सामने गमावले आहेत, तर दिल्ली संघाने या मोसमातील पहिला विजय शेवटच्या सामन्यात मिळवला आहे.

SRH vs DC (Photo Credit - Twitte)

आज आयपीएल 2023 च्या 34व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. हैदराबाद संघाने मागील दोन सामने गमावले आहेत, तर दिल्ली संघाने या मोसमातील पहिला विजय शेवटच्या सामन्यात मिळवला आहे. हैदराबाद संघाला पराभवाची हॅट्ट्रिक टाळायची आहे, तर दिल्लीचा संघ विजयाची मालिका कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीने प्लेइंग-11 मध्ये दोन बदल केले आहेत. पृथ्वी शॉला संघातून वगळण्यात आले आहे. रिपल पटेल आणि सर्फराज खान प्लेइंग-11 मध्ये परतले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), मिचेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एनरिच नॉर्टजे, कुलदीप यादव, इशांत शर्मा.

सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, एडन मार्कराम (कर्णधार), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement