SRH vs DC IPL 2021 Match 20: रिषभ पंतचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, अक्षर पटेलचा दिल्ली ताफ्यात समावेश

सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघात आज आयपीएलचा 20वा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. हैदराबादचे नेतृत्व डेविड वॉर्नरकडे आहे तर भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असेल. चेपॉकवरील आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार पंतने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

SRH vs DC IPL 2021 Match 20: रिषभ पंतचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, अक्षर पटेलचा दिल्ली ताफ्यात समावेश
दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

SRH vs DC IPL 2021: सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघात आज आयपीएलचा (IPL) 20वा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. हैदराबादचे नेतृत्व डेविड वॉर्नरकडे आहे तर भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतकडे (Rishabh Pant) संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी असेल. चेपॉकवरील आजच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार पंतने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबादने आजच्या सामन्यातून जगदिशा सूचितला (J Suchit) प्लेइंग इलेव्हनमध्ये  डेब्यूची साधी दिली आहे तर अक्षर पटेलचे (Axar Patel) दिल्ली संघात कमबॅक झालं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 25, 2021 07:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).