SRH Anthem Song: सनरायझर्स हैदराबादने आयपीएलसाठी नवीन गाण्याचा व्हिडिओ केला शेअर, पाहा

इंडियन प्रीमियर लीग सीझन 17 साठी सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) त्यांचे गाणे रिलीज केले आहे. टीमने गुरुवारी त्यांच्या नवीन गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

IPL 2024: इंडियन प्रीमियर लीग सीझन 17 साठी सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) त्यांचे गाणे रिलीज केले आहे. टीमने गुरुवारी त्यांच्या नवीन गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. सनरायझर्स हैदराबादचा आयपीएलमधील पहिला सामना 23 मार्चला होणार आहे. पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबाद ईडन गार्डनमध्ये पोहोचला आहे, जिथे संघ 23 मार्च रोजी केकेआर विरुद्ध पहिला सामना (SRH vs KKR) खेळेल. ऑस्ट्रेलियासाठी नुकताच एकदिवसीय विश्वचषक जिंकणारा कर्णधार पीट कमिन्स यंदा हैदराबादची जबाबदारी सांभाळणार आहे. संघाने त्याला एडन मार्करामच्या जागी कर्णधार बनवले आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स हा आयपीएल इतिहासातील पहिला खेळाडू आहे ज्याला लिलावात 20 कोटींहून अधिक बोली लागली आहे. हैदराबादने त्याला 20 कोटी 50 लाख रुपयांना खरेदी केले. (हे देखील वाचा: IPL 2024: आगामी आयपीएल मोसमात सर्वांच्या नजरा असतील 'या' अष्टपैलू खेळाडूंवर, आपल्या कामगिरीने करु शकतात कहर)

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now