Southern Brave Won by 2 Wicket: किरॉन पोलार्डच्या घातक खेळीमुळे सदर्न ब्रेव्हचा विजय, ट्रेंट रॉकेट्सचा 2 गडी राखून केला पराभव

या सामन्यात सदर्न ब्रेव्हने ट्रेंट रॉकेट्सचा दोन गडी राखून पराभव केला आहे.

Photo Credit - X

SOU Beat TRE, 24th Match The Hundred Mens: द हंड्रेड मेन्स स्पर्धा 2024 चा 24 वा सामना आज सदर्न ब्रेव्ह आणि ट्रेंट रॉकेट्स यांच्यात साउथहॅम्प्टनच्या द रोज बाउल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात सदर्न ब्रेव्हने ट्रेंट रॉकेट्सचा दोन गडी राखून पराभव केला आहे. तत्पूर्वी, ट्रेंट रॉकेट्सचा कर्णधार लुईस ग्रेगरीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 100 चेंडूत 8 गडी गमावून 126 धावा केल्या. ट्रेंट रॉकेट्सकडून टॉम बँटनने सर्वाधिक 30 धावा केल्या. सदर्न ब्रेव्हसाठी वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी सदर्न ब्रेव्हला 100 चेंडूत 127 धावांची गरज होती. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या सदर्न ब्रेव्ह संघाने 98 चेंडूत आठ गडी गमावून लक्ष्य गाठले. सदर्न ब्रेव्हसाठी किरॉन पोलार्डने सर्वाधिक 45 धावांची खेळी खेळली. किरॉन पोलार्डने 17 व्या षटकात राशिद खानला पाच षटकार ठोकले. ट्रेंट रॉकेट्सकडून जॉन टर्नरने सर्वाधिक तीन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif