IND vs SA 2nd Test Day 2 Live Scoe Update: जसप्रीत बुमराहचा कहर, घेतल्या पाच विकेट, दक्षिण आफ्रिकेच्या गमावल्या सात विकेट

याआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांत गारद झाला होता. भारताकडून मोहम्मद सिराजने सहा विकेट घेतल्या. त्यानंतर भारत पहिल्याच दिवशी पहिल्या डावात 153 धावांवर ऑलआऊट झाला.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये (Cape Town) खेळवला जात आहे. आज (गुरुवार) सामन्याचा दुसरा दिवस आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या दिवसाच्या 62/3 या धावसंख्येपुढे खेळण्यासाठी दुसऱ्या डावात उतरला आहे. याआधी सामन्याच्या पहिल्या दिवशी आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात 55 धावांत गारद झाला होता. भारताकडून मोहम्मद सिराजने सहा विकेट घेतल्या. त्यानंतर भारत पहिल्याच दिवशी पहिल्या डावात 153 धावांवर ऑलआऊट झाला. दमदार सुरुवातीनंतर संघाची मोठी धावसंख्या हुकली. एकवेळ भारताच्या 153 धावांत 4 विकेट्स होत्या. मात्र लुंगी अँगिडीच्या चेंडूवर केएल राहुलने खराब शॉट खेळून आपली विकेट गमावली. त्यानंतर पुढच्या 11 चेंडूत कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडीने संपूर्ण संघ 153 धावांवर आटोपला. दरम्यान, केपटाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताची शानदार सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने सहावी विकेट गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्कोर 116/7

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif