South Africa Beat Pakistan: रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा एक विकेटने विजय, विश्वचषकात पाकिस्तानचा सलग चौथा पराभव
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानला एका विकेटने पराभूत करून इतिहास रचला आहे.
आज, 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पाकिस्तानला एका विकेटने पराभूत करून इतिहास रचला आहे. तत्पूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेला पाकिस्तानचा संपूर्ण संघ 46.4 षटकांत 270 धावा करून सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून सौद शकीलने 52 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून तबरेझ शम्सीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अवघ्या 47.2 षटकांत नऊ गडी गमावून लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेसाठी स्टार फलंदाज एडन मार्करामने शानदार खेळी खेळत सर्वाधिक नाबाद धावा केल्या. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीने सर्वाधिक तीन बळी घेतले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)