South Africa Women vs West Indies Women, 3rd Match Live Toss Update: साऊथ आफ्रिकेने नाणेफेक जिंकून घेतला क्षेत्ररक्षणाचा निर्णय
तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
South Africa Women National Cricket Team vs West Indies Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 3rd Match Live Toss Update: 2024 ICC महिला T20 विश्वचषक सुरु झाला आहे. T20 विश्वचषकाचा तिसरा सामना आज दक्षिण आफ्रिका महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना दुबईतील दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेची कमान लॉरा वोल्वार्डच्या (Laura Wolvaardt) हातात आहे. तर वेस्ट इंडिजचे नेतृत्व हेली मॅथ्यू (Hayley Matthews) करत आहे. आता दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघ आणि वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यात एकूण 22 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. यामधील वेस्ट इंडिजने 14 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने केवळ सात सामने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल कळू शकला नाही. दरम्यान तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)