USA vs SA T20 WC 2024 Super 8 Live Score Update: दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेसमोर ठेवले 195 धावांचे लक्ष्य, डी कॉकने केल्या 74 धावा, सौरभने घेतल्या दोन विकेट
नाणेफेक हारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 194 धावा केल्या.
USA vs SA T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषक 2024 चा 41 वा सामना आज अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका (USA vs SA) यांच्यात खेळला जात आहे. सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना अँटिग्वा येथील नॉर्थ साऊंड येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. हे दोन्ही संघ टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच आमनेसामने आले आहेत. दरम्यान, अमेरिकेचा कर्णधार ॲरॉन जोन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 4 गडी गमावून 194 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 74 धावांची खेळी खेळली. अमेरिकेकडून सौरभ नेत्रावलकर आणि हरमीत सिंग यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी अमेरिकन संघाला 20 षटकात 195 धावा करायच्या आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)