South Africa Beat England: रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 7 धावांनी केला पराभव, उपांत्य फेरीत जवळपास निश्चित केले स्थान

टी-20 विश्वचषकाचा 45 वा सामना (T20 World Cup 2024) आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यात सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. दोन्ही संघांमधील सुपर-8 मधील हा पाचवा सामना होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला आहे.

SA Team (Photo Credit - X)

SA vs ENG T20 WC 2024 Super 8: टी-20 विश्वचषकाचा 45 वा सामना (T20 World Cup 2024) आज इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका (ENG vs SA) यांच्यात सेंट लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. दोन्ही संघांमधील सुपर-8 मधील हा पाचवा सामना होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला आहे. यासह दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे. तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 163 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी सलामीवीर क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक तीन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 156 धावा करता आल्या. इंग्लंड संघाकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक 53 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now