South Africa New Record: दक्षिण आफ्रिकेने आपल्या तुफानी फलंदाजीने विश्वचषकात रचला नवा इतिहास, श्रीलंकेविरुद्ध उभारली विश्वचषकातील सर्वात मोठी धावसंख्या
शनिवारी श्रीलंकेविरुद्ध (SA vs SL) प्रथम खेळताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 428/5 धावा केल्या, जे विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम आहे.
दक्षिण आफ्रिकेने (South Africa) आपल्या तुफानी फलंदाजीने विश्वचषकात नवा इतिहास रचला आहे. शनिवारी श्रीलंकेविरुद्ध (SA vs SL) प्रथम खेळताना दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 428/5 धावा केल्या, जे विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचे तीन फलंदाज, क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डर डसेन आणि एडन मार्कराम यांनी झंझावाती शतके झळकावून दक्षिण आफ्रिकेला या विक्रमी धावसंख्येपर्यंत नेले. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, ज्यांनी 2015 विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध 417/6 धावा केल्या होत्या. विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या 411/4 होती, जी त्यांनी 2015 विश्वचषकात आयर्लंडविरुद्ध केली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)